नांदेड आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

नांदेड दर्पण (NandedDarpan News) | विशेष वृत्त | दिनांक: ०९ जुलै २०२६ | ठिकाण: नांदेड

आज मध्यरात्री नांदेड शहर आणि जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. रात्री १ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले असून, सुमारे ३ मिनिटांपर्यंत लोकांना जमिनीला आणि घरांना सौम्य हादरे बसत असल्याचा अनुभव आला.

आज मध्यरात्री नांदेड शहर आणि जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. रात्री १ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास पहिला धक्का जाणवला असून, त्यानंतर रात्री २ वाजून १७ मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा दुसरा सौम्य धक्का जाणवला. सुमारे ३ मिनिटांपर्यंत लोकांना जमिनीला आणि घरांना हादरे बसत असल्याचा अनुभव आला.

नांदेड: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी मोजली गेली आहे. या भूकंपाचे मुख्य केंद्र शेजारील जिल्हा हिंगोलीपासून साधारण १८ किलोमीटर अंतरावर जमिनीच्या आत होते. हिंगोली केंद्रबिंदू असल्याने नांदेड आणि परभणीच्या अनेक भागातही याचे थेट हादरे जाणवले.

नागरिक घराबाहेर धावले

मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असताना अचानक भांडी वाजणे, खिडक्या आणि पंखे हलणे अशा प्रकारांमुळे नागरिकांना जाग आली. अचानक बसलेल्या या धास्तीमुळे नांदेड शहरातील अनेक भागांतील नागरिक सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ घराबाहेर पडले आणि मोकळ्या जागेत एकत्र आले. जवळपास ३ मिनिटे हे धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.

कुठलीही जीवित किंवा वित्तहानी नाही

भूकंपाची तीव्रता ४.४ (सौम्य ते मध्यम) असल्याने जिल्ह्यात कुठेही मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी (नांदेड दर्पण विशेष):

  • धक्के जाणवल्यास तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या मैदानात जावे.
  • लिफ्टचा वापर करणे टाळावे, जिन्याचा वापर करावा.
  • घराबाहेर पडणे शक्य नसल्यास मजबूत टेबल किंवा पलंगाखाली आश्रय घ्यावा.
  • अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी.