तुकाराम मुंढेंचा दणका: नांदेडमधील 'हॉटेल कविता' आणि 'सवेरा'चा परवाना निलंबित; हजारो लिटर तेल जप्त!
तुकाराम मुंढेंचा दणका: नांदेडमधील 'हॉटेल कविता' आणि 'सवेरा'चा परवाना निलंबित; हजारो लिटर तेल जप्त!
नांदेड (नांदेड दर्पण न्यूज): अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात भेसळ आणि अनियमिततेविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल, उपहारगृह आणि विविध दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली असून, यामध्ये गंभीर अनियमितता आढळल्याने हॉटेल कविता आणि हॉटेल सवेरा या नामांकित हॉटेल्सचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
या हॉटेल्स आणि दुकानांवर झाली कारवाई:
- हॉटेल सवेरा (देगलूरनाका): गंभीर अनियमिततेमुळे अन्न परवाना निलंबित.
- हॉटेल कविता (बाफना परिसर): गंभीर अनियमिततेमुळे अन्न परवाना निलंबित.
- ताडी दुकान (नवा मोंढा): परवाना निलंबित.
ताडी आणि हजारो लिटर खाद्यतेल जप्त
या धडक मोहिमेत केवळ हॉटेल्सवरच कारवाई झाली नाही, तर तेल उत्पादक व विक्रेत्यांवरही प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. कारवाई दरम्यान खालील साठा जप्त करण्यात आला:
- नवा मोंढा: ताडी दुकानातून १५८ लिटर ताडी जप्त करून नष्ट करण्यात आली.
- श्री स्वामी समर्थ ऑईल ट्रेडिंग (एमआयडीसी): येथून ३,१४८ लिटर सोयाबीन तेल जप्त.
- श्रीनिवास ऑईल अँड फुडस् (हदगाव): येथून १,३६३ लिटर तेल जप्त.
- ज्ञानाई स्पायसेस (कृष्णूर): येथून १,०६१ लिटर तेल जप्त.
- आयुष ओमकार इंडस्ट्री (एमआयडीसी): येथून १,०७८ किलो तेल जप्त करण्यात आले आहे.
व्यावसायिकांचे धाबे दणाणले
अन्न व प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक धोरणामुळे नांदेड जिल्ह्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ही बातमी आपल्या 'नांदेड दर्पण' पोर्टलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि नागरिकांना जागरूक करा!
No comments:
Post a Comment