नांदेड जिल्ह्यात सोमवार ठरला ‘घातवार’: लोहा, अर्धापूर अन् उमरी तालुक्यात भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १० जण जखम
नांदेड जिल्ह्यात सोमवार ठरला ‘घातवार’: लोहा, अर्धापूर अन् उमरी तालुक्यात भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १० जण जखमी
नांदेड जिल्ह्यासाठी सोमवारचा दिवस घातवार ठरला असून विविध भागांत घडलेल्या भीषण अपघातांच्या मालिकेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. लोहा, अर्धापूर आणि उमरी तालुक्यांत घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत.
१. हिंगोली-नांदेड महामार्गावर भीषण धडक: दुचाकीस्वाराचा मृत्यू, कारमधील ३ जण जखमी
हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील हिवरा फाट्याजवळ एका भरधाव कारने दुचाकीला (क्र. MH-26-BB-0760) पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार थेट २० फूट हवेत फेकला गेला, तर कार रस्त्याशेजारील शेतात जाऊन उलटली.
मृत्यू: व्यंकटी माधवराव गंगातीरे (वय ४५, रा. मुगट). (ते भवानी मंदिरात नवस फेडून परत जात होते.)
जखमी: कारमधील प्रशांत तिडके (वय ४५), ईशा प्रशांत तिडके (वय ४०) व आरोह प्रशांत तिडके (वय १४) हे गंभीर जखमी झाले आहेत.
२. काकांडी फाट्याजवळ शेताकडे जाणाऱ्या पिता-पुत्राला कारची धडक; वडिलांचा मृत्यू
नांदेड-हैदराबाद महामार्गावरील काकांडी जवळ शेताकडे जाणाऱ्या पिता-पुत्राला नांदेडहून नायगावकडे जाणाऱ्या हुंडाई कारने (क्र. TS-08-GU-7272) पाठीमागून निष्काळजीपणे धडक दिली.
मृत्यू: विनायक पांडुरंग पवार (वय ५४) यांचा जागीच मृत्यू झाला.
जखमी: त्यांचा मुलगा जलबाजी विनायक पवार (वय ३०) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कारवाई: अपघातानंतर पसार झालेल्या कारचालकाचा पाठलाग करत पोलिसांनी कल्याण टोल नाक्याजवळ सिनेस्टाईल पकडले असून सिडको ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३. मारतळाजवळ ॲपे ऑटो उलटून महिला ठार, ६ जण जखमी
लोहा तालुक्यातील मारतळा येथून प्रवासी घेऊन निघालेली ॲपे रिक्षा (क्र. MH-26-K-4358) अचानक ब्रेक लावल्यामुळे समोरील वाहनावर धडकून उलटली.
मृत्यू: अजमेरी फारूक पठाण (वय ६२, रा. मारतळा) यांचा जागीच मृत्यू झाला.
जखमी: अस्मिता भरकडे (वय १८), सीमा भरकडे (वय १८), रिक्षाचालक शिवदास भरकडे (वय २८), नागोराव सोरटे (वय ४५), कोमल घोलप (वय ३०) व कावेरीबाई घोलप (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत.
४. उमरी येथे रेल्वे रुळावर कुंटूरच्या तरुणाचा मृत्यू
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील संदीप लक्ष्मण हनुमंते (वय ४५) या तरुणाचा उमरी रेल्वे स्थानक परिसरातील रुळावर संशयास्पद स्थितीत रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. रेल्वेच्या धडकेमुळे मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. उमरी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

No comments:
Post a Comment